१३८. मन उधाण वाऱ्याचे...
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते ,नात्यांच्या बंधात धुंद मोहरते..
मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे ,का होते बेभान कसे गहिवरते...
मन उधाण वाऱ्याचे ...
आकाशी स्वप्नांच्या हरपुन पान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते,
सावरते बावरते झडते अडखळते का पडते..
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते..
मन तरंग होउन पाण्यावरती फ़िरते..
अन क्षणात फिरूनी अभाळाला भीडते..
मन उधाण वाऱ्याचे...
रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते..
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे नकळत का भरकटते..
कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा क चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागुन पळते..
मन उधाण वाऱ्याचे...
गीत : माहित नाही
संगीत : अजय, अतुल
स्वर : शंकर महादेवन
चित्रपट : अगं बाई अरेच्चा [२००४]
गीत - गुरू ठाकूर
ReplyDeletethis is very fantastic to read the songs on the blog spot such an amazing .............
ReplyDeleteSome corrections. I will post the entire song (I used the Vinoba Bhave style of transliteration to show the distinction in J and Z, e.g.):
ReplyDeleteमायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज़ पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते?
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांज़ेला कधी एकटेच झुलते
सावरते, बावरते, झडते, अडखळते, का पडते?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणांत फिरुनी आभाळाला भिडते
रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
ज़ाणते ज़री हे पुन्हा पुन्हा का चुकते?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते