नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम् शिवम् सुंदरा ॥धृ.॥
शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे, चिमणपाखरा ॥१॥
विद्याधन दे आम्हास
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतिरी, दयासागरा ॥२॥
होऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
किर्तीचा कळस जाई उंच अंबरा ॥३॥
गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीतकार : राम कदम
गायक : उत्तरा केळकर
चित्रपट : सुशिला (१९७८)
No comments:
Post a Comment