दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥
गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥
यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥
जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥
मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥
गीतकार : बा. भ. बोरकर
संगीत : वसंत प्रभू
गायिका : आशा भोसले
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)
नमस्कार मिलिंद, आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अनेक गाणी गुणगुणावीशी वाटतात, पण त्यांचे बोल माहीत नसतात. आपल्या अनुदिनीवर जुनी/नवी मराठी गाणी एकत्र उपलब्ध आहेत, ही मोठी सोय आहे. एक सूचना करु का? आपण जर गाण्याच्या शब्दांसोबत जर त्या गाण्याचा दुवा देऊ शकलात (musicindia.com किंवा geetsargam.net येथे उपलब्ध असल्यास), तर दुधात साखरच.
ReplyDelete