९१. कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा ॥धृ.॥
बारीक सुपारी निमचिकनी घालून
जायपत्री वेलची लवंग वरी दाबून
बांधले तसे या कुडीत पंचप्राण
घ्या रंगत करि मर्दुनी, चतुर्दशगुणी, सख्या सजणा ॥१॥
कमरेचा झुलता झोक नूर बिनधोक उरी मावेना
काजळी नजर छिनमिनी चांदणी रैना
छेडिता लालडी मुलाम तुमची गुलाम झाले सजणा
पायी पैंजण छन्नक छैना
गीत : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : सुलोचना चव्हाण
सुधीर फडकेंचे संगीत असलेल्या "का हो धरिला मजवर राग" ह्या गाण्याचे शब्द तुमच्याकडे आहेत का? असल्यास कृपया मला पाठवाल का?
ReplyDelete-वरदा
९६. क्रमांकाचे गाणे बघा.
ReplyDelete