११०. ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी ॥धृ.॥
त्या कातरवेळा थरथरती अधरी
त्या तिन्ही सांजाच्या आठवणी त्या प्रहरी
कितीदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी ॥१॥
कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मीच्या गाठी ॥२॥
कधि जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधी धुसफ़ुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी ॥३॥
गीत : बाळ कोल्हटकर
संगीत : वसंत देसाई
स्वर : कुमार गंधर्व
नाटक : देव दीनाघरी धावला
मिलींद, तुमच्या कडे "सुर येती विरुनी जाती" गाणं आहे का? मंगेश्कर .."हे गीत जीवनाचे"...
ReplyDeleteyaa gaanyaat pandit kumar gandharvanbarobar vaaNee jayaraam yaanchaahee swar aahe.
ReplyDelete