Wednesday, October 31, 2007

२०८. मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला ॥धृ.॥

२०८. मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला ॥धृ.॥

नका विचारू स्वारि कशी ?
दिसे कशी, अन्‌ हासे कशी ?
कसं पाडलं मला फशी ?
कशी जाहले राजिखुशी ?
नजीक येता मुहूर्तवेळा ॥१॥

नका विचारू गमतीजमती
काय बोललो पहिल्या भेटी ?
कसे रंगले स्वप्न पहाटी ?
कशी रंगली लाली ओठी ?
कसा जाहला जीव खुळा ? ॥२॥

अर्थ उलगडे समरसतेचा
सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा
धुंद बने बुल्बूल जिवाचा
घरी यायची झाली वेळा ॥३॥

गीत : मनमोहन नातू
संगीत : गजाननराव वाटवे
स्वर : सरोज वेलिंगकर

1 comment:

आशा जोगळेकर said...

This is too much,आज सकाळी अचानक हेच गाणं आलं तोंडात अन आत्ता ब्लॉग वर पण पूर्ण बघता आलं. आभार.