८७. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्
वंद्य वंदे मातरम् ॥धृ.॥
माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम् ॥१॥
याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले
शस्त्रहीना एक लाभे मंत्र वंदे मातरम् ॥२॥
निर्मीला हा मंत्र ज्यांनी आचारीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत, वंदे मातरम् ॥३॥
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीतकार : सुधीर फडके
गायक : सुधीर फडके
चित्रपट : वंदे मातरम् (१९४८)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment