सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? ॥धृ.॥
मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ? ॥१॥
हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ? ॥२॥
जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ? ॥३॥
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ? ॥४॥
गीतकार : सुरेश भट
संगीतकार : राम फाटक
गायक : सुधीर फडके
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
आणि मी समजत होतो की ह्या गाण्याचे गीतकार सुधीर मोघे आहेत!
Post a Comment