Thursday, November 30, 2006

६७. शोधू मी कुठे, कशी, प्रिया तुला?

६७. शोधू मी कुठे, कशी, प्रिया तुला?
प्रीती का देई साद ही मजला? ॥धृ॥

दिसे कुणी मज पुन्हा लपते, ग
घुमते का शीळ इथे ?
पदरी मी भास खुळे जपते, ग
हलले का पान तिथे ?
वारा हा काही सांगतो मजला ? ॥१॥

ओळखीची खूण काही पटते, ग
नच झाली भेट जरी
डोळियांच्या पापणीत मिटते, ग
उमटे जे बिंब उरी
येती या चाहुली कशा मजला ? ॥२॥

गीतकार : शांता शेळके
संगीतकार : अनिल - अरूण
गायक : लता मंगेशकर
चित्रपट : नाव मोठं लक्षण खोटं (१९७०)

No comments: