६८. शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मजला भूक लागली ॥धृ.॥
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली ॥१॥
धम्मक लाडू चापट पोळी
नको देऊ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली ॥२॥
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावरि खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली ॥३॥
गीतकार : योगेश्वर अभ्यंकर
संगीतकार : श्रीनिवास खळे
गायक : कुंदा बोकील (भागवत)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment