७३. शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी ॥धृ.॥
काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी ॥१॥
दुःख नको सुटताना, अश्रू नको वळताना
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी ॥२॥
साक्ष लाख तार्यांची, स्तब्ध अचल वार्याची
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी ॥३॥
गीतकार : मंगेश पाडगांवकर
संगीतकार : विश्वनाथ मोरे
गायक : सुमन कल्याणपूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment