तूच मायबाप बंधू तूच प्राणसखा
दीन दु:खितांचा एक तूच पाठीराखा ॥धृ.॥
धरित्रीची शय्या देशी आभाळाची छाया
जाणिवेच्या पलीकडे उभी तुझी काया
परी तुझ्या ओळखीला माणूस पारखा ॥१॥
तुझ्या हाती असे एक पुरातन काठी
आवाज न येई तिचा दिसे ना कुणा ती
कुणा देतसे आधार कुणाला तडाखा ॥२॥
सज्जनांचा कैवारी तू दुर्जनांचा वैरी
अनाथांच्या नाथा तुझी रूपे नानापरी
तुझ्याविना उभा जन्म होईल पोरका ॥३॥
गायक : श्रीकांत पारगावकर
संगीत : भास्कर चंदावरकर
गीत : सुधीर मोघे
चित्रपट : एक डाव भुताचा (१९८२)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment