Friday, December 1, 2006

७४. शालू हिरवा, पाचूनी मरवा, वेणी तिपेडी घाला

७४. शालू हिरवा, पाचूनी मरवा, वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा
गोर्‍या भाळी, चढवा जाळी, नवरत्नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा ॥धृ.॥

चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ गं
रेशिम धागे ओढीती मागे, व्याकुळ जीव हा झाला ॥१॥

सूर गुंफिते सनई येथे, झडे चौघडा दारी
वाजतगाजत मिरवत येईल घोडयावरुनी स्वारी
ही वरमाला घालीन त्याला, मुहूर्त जवळी आला ॥२॥

मंगलवेळी मंगलकाळी, डोळां का गं पाणी
साजण माझा हा पतीराजा, मी तर त्याची राणी
अंगावरल्या शेलारीला बांधून त्याचा शेला ॥३॥

गीतकार : शांता शेळके
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : उषा मंगेशकर

2 comments:

24b87531829388d15cd35fa3b4733000053b8acd said...

पाचू नी (आणि) मरवा असा अर्थ असावा?

majhiduniya said...

अतिशय सुंदर उपक्रम आहे. जास्तीत जास्त मराठी गाण्यांचा यात समावेश करावा ही इच्छा आणि या उपक्रमास माझ्या सदिच्छा.