१०७. लवलव करी पात, डोळं नाही थार्याला
एकटक पहावं कसं, लुकलूक तार्याला ॥धृ.॥
चवचव गेली सारी, जोर नाही वार्याला
सुटं सूटं झालं मन, धरु कसं पार्याला ॥१॥
कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची
रुणझूण हवा का ही, गाय उभी दाव्याची ॥२॥
तटतट करी चोळी, तुटतुटक गाठीची
उंबर्याशी जागी आहे, पारुबाई साठीची ॥३॥
गीतकार :आरती प्रभू
गायक :पद्मजा फेणाणी जोगळेकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :निवडुंग [१९८९]
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment