११५. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा ॥धृ.॥
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान
सा, नि, ध, प, म, ग, रे, सा, रे, ग, म, प
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा ! ससा म्हणाला, चहा हवा ॥१॥
कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान ! ससा म्हणाला, काढ पान ॥२॥
कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
(बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ)
आणि भरभर वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास ! ससा म्हणाला, करा पास ॥३॥
गीत : राजा मंगळवेढेकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : शमा खळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
आपला मराठी ब्लाँग आरत्यांचा संग्रह व ,कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा हे लहान मूलांचे गीत आवड्लेत.
राधा ही बावरी हे पण छान गीत आहे. प्रवासात हे सर्व गीत अतांक्षरीत म्हणता येतील.
आपण मूळ लेखक रचियीता यांची नावेही दिलीत त्या ही लोकांची ओळ्ख सहज गातांना होईल.
माझ्या मराठी ब्लाँगला भेट जरुर द्याल.अभिप्राय कळवा
सचिन पाटील
प्राजक्ता
http://sachinpatil123.blogspot.com
http://borsepraju.blogspot.com
Post a Comment