१२८. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश ॥धृ.॥
रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास ॥१॥
दंव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने, आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास ॥२॥
झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास ॥३॥
सार्या रंगावर आली एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट, निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास ॥४॥
गीत : सुधीर मोघे
संगीत : श्रीधर फडके
स्वर : आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट : लक्ष्मीची पाऊले [१९८२]
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment