Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

Thursday, November 29, 2007

२१६. कंठातच रुतल्या ताना, कुठे ग बाई कान्हा

२१६. कंठातच रुतल्या ताना, कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा, जा, जा, जा, घेउनि या मोहना ॥धृ.॥

कदंब-फांद्यावरी बांधिला, पुष्पपल्लव-गंधित झोला
कसा झुलावा, परि हा निष्चल, कुंजविहारीविना ॥१॥

थांबे सळसळ जशि वृक्षांची, कुजबुज सरली झणि पक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता, थबके ही यमुना ॥२॥

मुरलीधर तो नसता जवळी, सप्तस्वरांची मैफल कुठली ?
रासक्रिडेची स्वप्ने विरली, एका कृष्णाविना ॥३॥

गीत : गंगाधर महांबरे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : आशा भोसले

Thursday, August 16, 2007

१८१. का धरिला परदेश, सजणा

१८१. का धरिला परदेश, सजणा
का धरिला परदेश ?

श्रावण वैरी बरसे झिरमिर
चैन पडेना जीवा क्षणभर
जाऊ कोठे, राहू कैसी,
घेऊ जोगिणवेष ?

रंग न उरला गाली ओठी
झरती आसू काजळकाठी
शृंगाराचा साज उतरला,
मुक्त विखुरले केश

गीत :शांता शेळके
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर :बकुळ पंडित
नाटक :हे बंध रेशमाचे (१९६८)

Wednesday, July 25, 2007

१७६. कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा

१७६. कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा
रात्रीं तरी गाऊं नको, खुलवूं नको अपुला गळा ॥१॥

आधींच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जातां चिंब चुंबन देत दारीं थांबली ॥२॥


हार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला
आतांच आभाळांतला काळोख मीं कुरवाळला ॥३॥


सांभा
ळुनी माझ्या जिवाला मी जरासें घेतलें
इतक्यांत येतां वाजलीं हलकीं निजेंची पावलें ॥४॥

कळवाल का त्या कोकीळा, कीं झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली ॥५॥

गीत : अनिल [आ.रा.देशपांडे]
संगीत : यशवंत देव
स्वर : पं. वसंतराव देशपांडे

Wednesday, July 4, 2007

१४०. कसे सरतील सये..

१४०. कसे सरतील सये

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फ़ुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ऒठ वर हसे हसे उरातुन वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळीमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

कोण तुझ्या सौधातून ऊभे असे
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ऒले
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फ़ुलं दोन ...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग
जातानाही पायभर मखमल ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया आबोलीची फ़ुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना

गुलाबाची फ़ुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

Thursday, June 28, 2007

११५. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा

११५. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा ॥धृ.॥

सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान
सा, नि, ध, प, म, ग, रे, सा, रे, ग, म, प
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा ! ससा म्हणाला, चहा हवा ॥१॥

कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान ! ससा म्हणाला, काढ पान ॥२॥

कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
(बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ)
आणि भरभर वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास ! ससा म्हणाला, करा पास ॥३॥

गीत : राजा मंगळवेढेकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : शमा खळे

१०९. काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा

१०९. काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापनी कधि रे येशिल राजा ॥धृ.॥

पाऊस येडापिसा जिवाला लावून गेला तात
तुफान आलं सुसाट माजा करुन गेला घात
कातरवेळी करनी जाली हरवून गेला राजा ॥१॥

सुकली फुलांची शेज राया राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळवाया श्वासांनी तोडिला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतुनी ये रे ये एकदा राजा ॥२॥

गीत : सुधीर मोघे
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले
चित्रपट : हा खेळ सावल्यांचा [१९७६]

१०८. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली

१०८. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली ॥धृ.॥

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली ॥१॥

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली! ॥२॥


उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली! ॥३॥

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली! ॥४॥

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली ॥५॥

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली? ॥६॥

गीत : सुरेश भट
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले
चित्रपट : निवडुंग [१९८९]

Monday, June 18, 2007

९६. का हो धरिला मजवर राग ?

९६. का हो धरिला मजवर राग ? ॥धृ.॥

शेजा-याचे घरी येता वरचेवरी
तुमचे लाडीक बोल येती कानावरी
आणि जागेपणी येते स्वप्नांना जाग
माझ्या स्वप्नांना जाग, माझ्या स्वप्नांना जाग ॥१॥

वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे
भारी हट्टी स्वभाव, तुम्ही जाता पुढे
जाता चैतापरी माझी फुलवून बाग ॥२॥

जाणे येणे होते तुमचे माझ्या घरी, माझ्या घरी
तुमच्या पावलांनी वाट पडली परसूदारी
वाटतं फिरुन याल अवचित केंव्हा तरी, केंव्हा तरी
खुळ्या प्रीतीचा माग, खुळ्या प्रीतीचा माग ॥३॥

गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीतकार : सुधीर फडके
गायक : आशा भोसले
चित्रपट : जगाच्या पाठीवर (१९६०)

Wednesday, April 25, 2007

९१. कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना

९१. कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा ॥धृ.॥

बारीक सुपारी निमचिकनी घालून
जायपत्री वेलची लवंग वरी दाबून
बांधले तसे या कुडीत पंचप्राण
घ्या रंगत करि मर्दुनी, चतुर्दशगुणी, सख्या सजणा ॥१॥

कमरेचा झुलता झोक नूर बिनधोक उरी मावेना
काजळी नजर छिनमिनी चांदणी रैना
छेडिता लालडी मुलाम तुमची गुलाम झाले सजणा
पायी पैंजण छन्नक छैना

गीत : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : सुलोचना चव्हाण

Friday, November 17, 2006

३६. कशी नशीबाने थट्टा आज मांडली

३६. दहा दिशांनी, दहा मुखांनी, आज फोडिला टाहो,
आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो !

माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! ॥धृ.॥

गंगेवानी निर्मळ होतं, असं एक गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! ॥१॥

अशा गावि होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! ॥२॥

सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला, नदीपार केली
नार सूड भावनेनं, उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! ॥३॥

पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गावं येडा झाला
त्यांनी लाज भीड निती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! ॥४॥

जाब विचाराया गेला, तिनं केला डाव
भोवयात शृंगाराच्या सापडली नावं
त्याच्या पतंगाची दोरी तिनं तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! ॥५॥

खुळ्या जीवा कळला नाही खोटा तिचा खेळ,
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल,
त्याला कुत्र्या-मांजराची दशा आळली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! ॥६॥

जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा,
जळूनिया गेली आता, जगायची आशा,
आज हुंदक्यानं भैरवी मी गाईली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! ॥७॥

याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! ॥८॥

गायक : सुधीर फडके
गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीतकार : राम कदम
चित्रपट : पिंजरा (१९७७)

१३. कळा ज्या लागल्या जीवा, मला कीं ईश्वरा ठाव्या !

कळा ज्या लागल्या जीवा, मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे? कुणाला काय सांगाव्या ? ॥धृ.॥
उरीं या हात ठेवोनी, उरींचा शूल का जाई?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाहीं ॥१॥
जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू ॥२॥
नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठें नावा,
भुतांची झुंज ही मागें, धडाडे चौंकडे दावा ॥३॥
नदी लंघोनी जे गेले, तयांची हांक ये कानीं,
इथें हे ओढिती मागें, मला बांधोनी पाशांनीं ॥४॥
कशी साहूं पुढें मागें, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट् काळिजाचे हे, तुटाया लागती धागे ॥५॥
पुढे जाऊ वळू मागे, करू मी काय रे देवा
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा ॥६॥
गायिका : लता मंगेशकर
गीतकार : भा.रा. तांबे
संगीत : वसंत प्रभू

Thursday, November 16, 2006

१०. कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम

कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम
भाबड्या भक्तासाठिं, देव करी काम
राजा घन:श्याम ॥धृ.॥

एक एकतारी हातीं, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ
राजा घन:श्याम ॥१॥

दास रामनामीं रंगे, राम होई दास
माग चालवीतो प्रेमें, विटेना श्रमास
राजा घन:श्याम ॥२॥

विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
ठाई ठाई शेल्यावरतीं उठे रामनाम
गुप्त होई राम ॥३॥

हळू हळू उघडी डोळे, पाहि जों कबीर
विणूनिया शेला गेला, सखा रघुवीर
कुठें म्हणे राम ॥४॥

गायिका : माणिक वर्मा
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीत : पु. ल. देशपांडे