२२१. घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी
प्रसवे अवस सुवर्णा अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?
फूल हसे काट्यांत बघ कसे
काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे
रे, उघड नयन, कळ पळे दुरी
फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?
मना, वृथा का भीती मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी
गीत :भा. रा. तांबे
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर
Showing posts with label घ. Show all posts
Showing posts with label घ. Show all posts
Friday, April 18, 2008
Thursday, November 29, 2007
२१९. घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
२१९. घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात ! ॥धृ.॥
"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं ! ॥१॥
विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं. ॥२॥
फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो. ॥३॥
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार ! ॥४॥
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ? ॥५॥
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !" ॥६॥
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला ! ॥७॥
गीत : कृ. ब. निकुंब
संगीत : कमलाकर भागवत
स्वर : सुमन कल्याणपूर
माहेरी जा, सुवासाची कर बरसात ! ॥धृ.॥
"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं ! ॥१॥
विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं. ॥२॥
फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो. ॥३॥
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार ! ॥४॥
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ? ॥५॥
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !" ॥६॥
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला ! ॥७॥
गीत : कृ. ब. निकुंब
संगीत : कमलाकर भागवत
स्वर : सुमन कल्याणपूर
Friday, November 17, 2006
५१. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद ॥धृ.॥
मिटता कमलदल होई बंदी भृंग
तरि सोडिना ध्यास, गुंजनात दंग ॥१॥
बिसतंतू मृदु होति जणु वज्रबंध
स्वरब्रह्म आनंद ! स्वर हो सुनंध ॥२॥
स्वर : पं. वसंतराव देशपांडे
गायक : पं. जितेंद्र अभिषेकी
गीत : पुरूषोत्तम दारव्हेकर
नाटक : कट्यार काळजात घुसली (१९६७)
मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद ॥धृ.॥
मिटता कमलदल होई बंदी भृंग
तरि सोडिना ध्यास, गुंजनात दंग ॥१॥
बिसतंतू मृदु होति जणु वज्रबंध
स्वरब्रह्म आनंद ! स्वर हो सुनंध ॥२॥
स्वर : पं. वसंतराव देशपांडे
गायक : पं. जितेंद्र अभिषेकी
गीत : पुरूषोत्तम दारव्हेकर
नाटक : कट्यार काळजात घुसली (१९६७)
५०. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा
घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.
कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुनंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥
वर्षाकालिन सायंकाली
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥
कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥
गायक : मन्ना डे
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीत : वसंत पवार
चित्रपट : वरदक्षिणा (१९६२)
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.
कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुनंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥
वर्षाकालिन सायंकाली
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥
कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥
गायक : मन्ना डे
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीत : वसंत पवार
चित्रपट : वरदक्षिणा (१९६२)
४९. घट डोईवर घट कमरेवर,
घट डोईवर घट कमरेवर,
सोडी पदरा, नंदलाला, नंदलाला रे ॥धृ.॥
कुणीतरी येईल अवचित पाहिलं
जाता जाता आगहि लाविल,
सर्व सुखाच्या संसाराला, नंदलाला रे ॥१॥
हलता कलता, घट हिंदळता
लज्जेवरती पाणी उडता
नकोच होईन मीच मला, नंदलाला रे ॥२॥
केलीस खोडी, पुरे एवढी
जोवर हसते मनात गोडी
हसुनी तूही हो बाजूला, नंदलाला रे ॥३॥
गायिका : लता मंगेशकर
गीत : पी. सावळाराम
संगीत : वसंत प्रभू
सोडी पदरा, नंदलाला, नंदलाला रे ॥धृ.॥
कुणीतरी येईल अवचित पाहिलं
जाता जाता आगहि लाविल,
सर्व सुखाच्या संसाराला, नंदलाला रे ॥१॥
हलता कलता, घट हिंदळता
लज्जेवरती पाणी उडता
नकोच होईन मीच मला, नंदलाला रे ॥२॥
केलीस खोडी, पुरे एवढी
जोवर हसते मनात गोडी
हसुनी तूही हो बाजूला, नंदलाला रे ॥३॥
गायिका : लता मंगेशकर
गीत : पी. सावळाराम
संगीत : वसंत प्रभू
Subscribe to:
Posts (Atom)