Showing posts with label ध. Show all posts
Showing posts with label ध. Show all posts

Wednesday, December 13, 2006

७७. धूके दाटलेले उदास उदास

७७. धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास ॥धृ.॥

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास ॥१॥

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास ॥२॥

क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास ॥३॥

गीतकार :मंगेश पाडगांवकर
गायक :अरुण दाते
संगीतकार :यशवंत देव

Friday, November 17, 2006

४०. धुंद एकांत हा, प्रीत आकारली

धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडीता, तार झंकारली
जाण नाही मला,प्रीत आकारली
सहज तू छेडीता, तार झंकारली ॥धृ.॥

गंधवेडी कुणी, लाजरी बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीपरी
यौवनाने तिला आज शृंगारली ॥१॥

गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली ॥२॥

रोमरोमांतूनी गीत मी गायिले
दाट होता धुके, स्वप्न मी पाहीले
पाहता पाहता रात्र अंधारली
आज बाहूत या लाज आधारली ॥३॥

गायक :आशा - सुधीर फडके
गीतकार :जगदीश खेबुडकर
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :अनोळखी - १९७३