१९८. निळासावळा नाथ, तशीही निळी सावळी रात
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात ॥धृ.॥
तुडवूनि वन, धुंडुनी नंदनवन
शोधुनि झाले अवघे त्रिभुवन
एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात ॥१॥
नील जळी यमुनेच्या साची
होडि सोडिली मी देहाची
गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासांत ॥२॥
गीत : गंगाधर महांबरे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : कुंदा बोकील
Showing posts with label न. Show all posts
Showing posts with label न. Show all posts
Monday, October 1, 2007
Thursday, July 5, 2007
१४६. नसतेस घरी तू जेंव्हा
नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो.
नभ फाटून वीज पडावी
कल्लॊळ तसा ऒढवतो,
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो.
येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो.
तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघव वेळा,
श्वासाविन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो.
तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा,
समचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो.
ना अजुन झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो,
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो.
कवी: संदीप खरे
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो.
नभ फाटून वीज पडावी
कल्लॊळ तसा ऒढवतो,
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो.
येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो.
तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघव वेळा,
श्वासाविन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो.
तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा,
समचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो.
ना अजुन झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो,
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो.
कवी: संदीप खरे
Monday, July 2, 2007
११८. नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं
११८. नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ॥१॥
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ॥२॥
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रितभात ॥३॥
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ॥४॥
गीत : ना. धों. महानोर
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले
चित्रपट : जैत रे जैत [१९७७]
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ॥१॥
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ॥२॥
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रितभात ॥३॥
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ॥४॥
गीत : ना. धों. महानोर
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले
चित्रपट : जैत रे जैत [१९७७]
Wednesday, June 27, 2007
१०२. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला
१०२. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ॥धृ.॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥
शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...
नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...
या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...
गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर
गायक :लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

Wednesday, December 13, 2006
८२. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम
८२. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम ॥धृ.॥
कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरी नाम ॥१॥
बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा
हाच तुक्याचा विठठल आणि दासाचा श्रीराम ॥२॥
जितुके मालक, तितकी नावे, हृदये जितकी याची गावे
कुणी न ओळखी तरीही याला, दिन अनाथ अनाम ॥३॥
गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :आशा भोसले, सुधीर फडके
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :जगाच्या पाठीवर (१९६०)

Tuesday, November 28, 2006
६२. निसर्गराजा ऐक सांगतेऽऽऽऽ
उः मेघंनोऽऽऽ, वृक्षांनोऽऽऽ
वेलींनो, कळ्यांनो, फुलांनो
तेरी भी चुप, मेरी भी चुप
कुणाला काही सांगू नका
कबुल?
निसर्गराजाऽऽऽऽ, ऐक सांगते... |
गुपित्त जपलयं रे................. | (२)
कुणी माझ्या मनात लपलय रे(४) |
निसर्गराजा ऐक सांगतेऽऽऽऽ
उः तो दिसला अन् मी पाहिले
चं : पाहिले परी ते कुर्र्याने
उः डोळ्यात ईशारे हसले
चं : हसले ते मोठ्या तोर्याने
उः ते कसे न त्याला कळले
चं : कळले न तुझ्या त्या ओठाने
उः ओठ न हलले, शब्द न जुळले, थोडे चुकले रे . १
चं : निसर्गराजाऽऽऽऽ, ऐक सांगतो... |
गुपित्त जपलयं रे...................... | (२)
कुणी माझ्या मनात लपलय रे(४)..... |
निसर्गराजा ऐक सांगतोऽऽऽऽ
चं : का चाललात
उः तुम्ही आलात म्हणुन
चं : जरा थांबा ना
उः का?
चं : वा, छान दिसतयं
उः काय?
चं : हे रुप भिजलेलं
हं, अन् ते पहा
उः काय?
चं : तुमच मन ही भिजलेलं
उः कशान?
चं : प्रेमान, प्रेमान, प्रेमान(२)
उः छाट् छट् .. २
चं : निसर्गराजाऽऽऽऽ, ऐक सांगतो
चं : तो भाव प्रीतीचा दिअसला
उः दिसला मग संशय कसला
चं : हा नखरा का मग असला?
उः प्रेमात बहाणा कसला
प्रीत अशी न् रीत अशी का? कोड पडलयं रे .. ३
कुणी माझ्या मनात लपलय रे...
चित्रपट : झुंज
गायक, गायिकाः चंद्रशेखर गाडगीळ, उषा मंगेश्कर
संगीत : राम कदम
गीत : जगदीश खेबुडकर

६१. नकोच छेडू आज
६१. नकोच छेडू आज
प्रिया, नकोच छेडू आज
डोळ्यात उभी लाज, नकोच छेडू आज
भिरभिरत्या वार्यातुनी साद तुझी ऐकते
सळसळत्या पानातुनी प्रीत तुझी बोलते
होऊनी ये तू वसंत फुलातुनी आज.१
थरथरता हिरवळ ही, चाहुल तव लागते
तळमळता दिवस रात्र, स्वप्न तुझे जागते
होऊनी ये नीज परी स्वप्नातुनी आज..२
मेघावर नाव तुझे कोरले असे कुणी
पाण्यावर चित्र तुझे रेखिले असे कुणी
एकदाच वर्षत ये मेघातुनी आज ३
चित्रपटः लग्नाला जातो मी
गायिकाः आशा भोसले
संगीतः सुधीर फडके
गीतः मधुसूदन कालेलकर
प्रिया, नकोच छेडू आज
डोळ्यात उभी लाज, नकोच छेडू आज
भिरभिरत्या वार्यातुनी साद तुझी ऐकते
सळसळत्या पानातुनी प्रीत तुझी बोलते
होऊनी ये तू वसंत फुलातुनी आज.१
थरथरता हिरवळ ही, चाहुल तव लागते
तळमळता दिवस रात्र, स्वप्न तुझे जागते
होऊनी ये नीज परी स्वप्नातुनी आज..२
मेघावर नाव तुझे कोरले असे कुणी
पाण्यावर चित्र तुझे रेखिले असे कुणी
एकदाच वर्षत ये मेघातुनी आज ३
चित्रपटः लग्नाला जातो मी
गायिकाः आशा भोसले
संगीतः सुधीर फडके
गीतः मधुसूदन कालेलकर
Friday, November 17, 2006
२५. नाचनाचुनीं अति मी दमलें, थकलें रे नंदलाला ! ॥धृ.॥
नाचनाचुनीं अति मी दमलें, थकलें रे नंदलाला ! ॥धृ.॥
निलाजरेपण कटिस नेसलें, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचें कुंडल कानीं, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची, कंठिं घातली माला ॥१॥
विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीति नूपुर पायीं, कुसंगती करताला
लोभ प्रलोभन नाणीं फेंकी, मजवर आला-गेला ॥२॥
स्वतःभोवतीं घेतां गिरक्या, अंधपणा कीं आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठुन गेला
अंधारीं मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला ॥३॥
गायिका : आशा भोसले
गीतकार : ग.दि. माडगुळकर
संगीत : सुधीर फडके

१९. नीजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो ॥
नीजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो ॥
नरसिंह होऊनीया घुमवीत गर्जनासी
शत सूर्य तेज दावा अज्ञात या जनासी
भ्याला समुद्र तो हा ते रामचंद्र व्हा हो ॥१॥
पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा
मुरलि मनोहरा या वा वाजवीत पावा
एका करांगुलीने गोवर्धना धरा हो ॥२॥
राजध्रमापटु या प्रत्यक्ष एकवार
श्रीकृष्ण विष्णु राम तोची विठू महार
जाळी तनामनाची ती आग शांतवा हो ॥३॥
संगीतकार : सुधिर फडके
गायक : सुधिर फडके
गीतकार : ग. दि. माडगूळकर

१६. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे
या झर्याचा सूर आता मंद झाला रे ॥१॥
झोपल्या गोठयात गाई, साद वा पडसाद नाही
पाखरांचा गलबला ही बंद झाला, बंद झाला रे ॥२॥
सावल्यांची तीट गाली, चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे ॥३॥
नीज रे आनंदकंदा, नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागर्यांचा छंदताला, छंदताला रे ॥४॥
गायक :लता मंगेशकर
गीतकार : मंगेश पाडगांवकर

Subscribe to:
Posts (Atom)