१९७. दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही
नाव आहे चाललेली, कालही अन् आजही ॥धृ.॥
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा
मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा ॥१॥
याद नाही, साद नाही ना सखी ना सोबती
नाद आहे या घड्याला अन् घड्याच्या भोवती ॥२॥
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली दूरची हाले हवा ॥३॥
एकला मी नाही जैसा, नाही नाही मी दुणा
जीवनाला ऐल नाही पैल तैसा मध्य ना ॥४॥
गीत : आरती प्रभू
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment