Tuesday, November 28, 2006

६३. झुंज झुंज झुंज

झुंज झुंज झुंज
झुंजार माणसा, झुंज दे(२)
हेच तुझे रे काम
माणुस असुनी, माणुस करतो
माणुसकी बदनाम
झुंजार माणसा झुंज दे

लढले दानव, लढले मानव
कधी न सरले अकांड तांडव
युगायुगांचे असे युद्ध हे
नाही त्यास विराम . १

भयाण सुटला वादळवारा
रंग झोकुनी येता मोरा(?)
बलदंडालाही खाली खेचुन
बनवी त्यास गुलाम .. २

चित्रपट : झुंज
गायकः सुधीर फडके
संगीत : राम कदम
गीत : जगदीश खेबुडकर

No comments: