लळा जिव्हाळा शब्दच खोटे । मासा मासा खाई॥
कुणी कुणाचे नाहि, राजा कुणी कुणाचे नाहि ।
लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।
पिसे सनतडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे ।
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले पिल्लू ऊडूनी जाई ॥१॥
रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया ।
कोण कुणाची बहिण भाऊ, पती पुत्र वा जाया ।
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही ॥२॥
माणूस करतो प्रेम स्वत:वर, विसरुन जातो देवा
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन् सद्भावा
कोण कुणाचा कशास होतो या जगी उतराई॥३॥
कुणी कुणाचे नाहि, राजा कुणी कुणाचे नाहि ।
लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।
चित्रपट : जिव्हाळा [१९६८]
गायक : सुधीर फडके
गीतकार : ग. दि. माडगूळकर
संगीतकार : श्रीनिवास खळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment