अवं हे गाव लई न्यारं, हितं थंडगार वारं
याला गरम शिणगार सोसंना
ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा
हितं शाहिरी लेखणी पोचंना
हितं वरण भाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेदी रं
अरं सोंगा ढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय अळीमिळी
अन् सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन् भायेर नळी रं, रं, रं
अगं चटक चांदणी, चतुर कामिनी
काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी
अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं ॥धृ.॥
नवतीचं रान हे भवतीनं, फिरत आले मी गमतीनं
बांधावरनं चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी
अरं लाजमोड्या, भलल्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव्हं ॥१॥
डौल दावतो मोराचा, तिरपा डोळा चोराचा
वढ्याच्या काठाला आडिवतो, अंगावर पानी उडिवतो
अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं ॥२॥
मिरचीचा तोरा मी करते रं, वट्यात ऐवज भरते रं
पदर माझा धरतोस कसा, भवतीनं माझ्या फिरतोस कसा
अरं बत्ताशा, कशाला पिळतोस मिशा, हे वागणं बरं नव्हं ॥३॥
हिरवी शेतं दरवळली, टपोरी कणसं मोहरली
शिळ घालूनी करतोस खूणा, घडीघडी हा चावटपणा
अरं मर्दा, अब्रूचा होईल खुर्दा, हे वागणं बरं नव्हं ॥४॥
गायिका : उषा मंगेशकर
गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीत : राम कदम
चित्रपट : पिंजरा (१९७७)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment