सासुऱ्यास चालली, लाडकी शकुंतला
चालतो तिच्यासवें, तिच्यांत जीव गुंतला ! ॥धृ॥
ढाळतात आंसवें मोर-हरिणशावकें
मूक आज जाहले सर्व पक्षी बोलके
यापुढें सखी नुरे, माधवी-लते, तुला! ॥१॥
पान पान गाळुनी दु:ख दाविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरूं
दंतिं धरूनि पल्लवा, आडवी खुळी तिला ! ॥२॥
भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्मदांस सोसवे, दु:ख हें कसें बरें ?
कन्यका न, कनककोष मीं धन्यास अर्पिला ! ॥३॥
गायक : सुधीर फडके
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीत : सुधीर फडके
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment