Thursday, November 16, 2006

१०. कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम

कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम
भाबड्या भक्तासाठिं, देव करी काम
राजा घन:श्याम ॥धृ.॥

एक एकतारी हातीं, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ
राजा घन:श्याम ॥१॥

दास रामनामीं रंगे, राम होई दास
माग चालवीतो प्रेमें, विटेना श्रमास
राजा घन:श्याम ॥२॥

विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
ठाई ठाई शेल्यावरतीं उठे रामनाम
गुप्त होई राम ॥३॥

हळू हळू उघडी डोळे, पाहि जों कबीर
विणूनिया शेला गेला, सखा रघुवीर
कुठें म्हणे राम ॥४॥

गायिका : माणिक वर्मा
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीत : पु. ल. देशपांडे

1 comment:

Sumedha said...

वा! हे फारच छान काम केलेत!