भारतीय नागरिकांचा, घास रोज अडतो ओठीं
सैनिक हो तुमच्यासाठीं ॥धृ.॥
वावरतों फिरतों आम्ही, नित्यकर्म अवघें करतों,
राबतों आपुल्या क्षेत्रीं, चिमण्यांचीं पोटें भरतों,
परि आठव येतां तुमचा, आतडें तुटतसे पोंटीं ॥१॥
आराम विसरलों आम्ही, आळसा मुळीं ना थारा,
ऍकतांच कां अश्रूंची डोळ्यांत होतसे दाटी ॥२॥
उगवला दिवस मावळतो, अंधार दाटतो रात्रीं
माऊली नीज फिरवीते, कर अपुले थकल्या गात्रीं
स्वप्नांत येऊनी चिंता, काळजा दुखविते देठीं ॥३॥
रक्षितां तुम्ही स्वातंत्र्या, प्राणास घेऊनी हातीं
तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठीं, झुरतात अंतरें कोटी ॥४॥
गायिका : आशा भोसले
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीत : दत्ता डावजेकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment