लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा
जय देव जय देव ॥धृ॥
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा
जय देव जय देव ॥धृ॥
देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हलाहल जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा
जय देव जय देव ॥धृ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा
जय देव जय देव ॥धृ॥
- संत रामदास
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment