Thursday, November 16, 2006

९. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं

दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं, मायेची वयनी
हसत डुलत, मोत्याचं पीक येतं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं

लाडकी लेक, राजाचा ल्योक
लगीन माझ्या चिमनीचं

सावळा बंधूराया, साजिरी वयनी बाई
गोजिरी शिरपा हंसा, माहेरी माज्या हाई
वाटेनं माहेराच्या धावत मन जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं

गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी गं

राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी, जीवाचं लिंबलोनं
मायेला पूर येतो, पारुचं मन गातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं

गायक :लता मंगेशकर
गीतकार : योगेश [भालजी पेंढारकर]
संगीतकार :आनंदघन
चित्रपट :साधी माणसं [१९६३]

1 comment:

Shielesh Damle said...

Geetkaar : Yogesh (Bhalaji Pendharkar)