जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे ॥ धृ.॥
बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी राधेच्या परी ते वाढले सुखात
कर्णराज त्याचे नाव अमर आहे ॥ १ ॥
भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने
नरसिंहे रूपे त्याला रक्षिले प्रभूने
अलौकीक त्याची मुर्ती अजुनही विश्वी या आहे ॥ २ ॥
साधुसंत कबीराला त्या छळीती लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे
आसवेच त्याची झाली दु:खे रुप दोहे ॥ ३ ॥
गायिका : सुमन कल्याणपूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment