Friday, November 17, 2006

३८. डाव मांडून भांडून मोडूं नको ॥धृ.॥

डाव मांडून भांडून मोडूं नको ॥धृ.॥

आणलें तूं तुझें सर्व, मी आणलें,
सर्व कांही मनासारखें मांडलें,
तूंच सारें तुझें दूर ओढूं नको ॥१॥

सोडले मी तुझ्याभोवतीं सर्व गे,
चंद्रज्योतीरसाचे रूपेरी फुगे,
फुंकरीनें फुगा, हाय, फोडूं नको ॥२॥

'गोकुळींचा सखा' तूंच केलें मला,
कौतुकानें मला हार तूं घातला,
हार हांसून घालून तोडूं नको ॥३॥

काढलें मीं तुझें नांव, तूं देखिलें,
आणि माझें पुढें नांव तूं रेखिलें,
तूंच वाचून लाजून खोडूं नको ॥४॥

गायक : सुधीर फडके
गीतकार : ना. घ. देशपांडे
संगीतकार : राम फाटक

No comments: