आई, बघ ना कसा हा दादा ?
मला चिडवायचं हाच याचा धंदा ॥धृ.॥
लग्न बाहुलीचं लावतां आम्ही
म्हणतो, "नवरदेव आहें मी
आतां मलाच मुंडावळि बांधा" ॥१॥
कधीं मोठे मोठे करतो डोळे
कधीं उगाच विदुषकि चाळे
भारी खट्याळ, नाहिं मुळिं साधा ॥२॥
दादा भलताच द्वाड आहे आई
खोड्या करून छळतो बाई
याला ओवाळायचि नाहिं मी यंदा ॥३॥
गायक :सुषमा श्रेष्ठ
गीतकार :शांता शेळके
संगीतकार :सी रामचंद्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment