बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला ॥धृ.॥
चिमणी मैना, चिमणा रावा
चिमण्या अंगणी, चिमणा चांदवा
चिमणी जोडी, चिमणी गोडी
चोच लाविते, चिमण्या चार्याला
चिमणं, चिमणं, घरटं बांधलं चिमण्या मैनेला ॥१॥
शिलेदार घरधनी माझा, थोर मला राजांचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला, त्याच्या पायाला ॥२॥
रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगूनी जीव रंगला
गोजिरवाणी, मंजूळगाणी, वाजविते बासुरी डाळिंब ओठाला
येडं, येडं, मन येडं झालं, ऐकून गान्याला ॥३॥
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :आनंदघन
चित्रपट :मोहित्यांची मंजुळा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment