Friday, November 17, 2006

४७. त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला
पैशात भावनेचा व्यापार पाहीला मी ॥धृ.॥

अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मी ॥१॥

रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतू
वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहीला मी ॥२॥

थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्य ही जरासा लाचार पाहीला मी ॥३॥

गायक :श्रीधर फडके
गीतकार :अनिल कांबळे
संगीतकार :श्रीधर फडके

No comments: